❤️देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चं प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती
अखेर तो क्षण आलाच जेव्हा देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्यात आलं. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचं सांगितलं जात आहे.
याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवलं होतं. Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
यानंतर GSAT-11 चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचं काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.

0 Reviews:
Post a Comment