24 November Special


♻️२४ नोव्हेंबर दिनविशेष ♻️

✳️ महत्त्वाच्या घटना

✍२००० : भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
✍१९९८ : समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहल्यादेवी होळकर पुरस्कार‘ आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
✍१९९६ : इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
✍१९९२ : कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
✍१९९२ : वैज्ञानिक संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला पुरस्कार’ हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
✍१९९२ : देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ जाहीर
✍१९४४ : दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
✍१८५९ : चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
✍१७५० : महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद

🎇जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

✍१९६१ : अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
✍१९५५ : इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
✍१९१४ : लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
✍१८९४ : हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)


🌸मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन


✍२००४ : आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (जन्म: ५ एप्रिल १९२०)
✍२००३ : उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (जन्म: १ जानेवारी १९२३)
✍१९६३ : ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी (जन्म: १८ आक्टोबर १९३९)
✍१९६३ : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३), मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १९००)
✍१६७५ : गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (१ एप्रिल १६२१)

☀️ रशिया ☀️

🎯रशियाचा इतिहास🎯

🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.

🔴पूर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली .

🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात .

🔴जून १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली .

*🎯रशियन साम्राज्य-🎯*

🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला.

🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले.

*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले.

🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला.

🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.

🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले.

🔵हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.

🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.

🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले.

🔵कैथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .

 *🎯सोव्हियेत रशिया-🎯*

सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.

🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.

🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती.

🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.

*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता.

🔵सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल.

🔴सैबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती.

🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

❇️❇️ भुगोल ❇️❇️


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)



🌸🌸💕संगणकाचे नेटवर्क 💕🌸🌸

✍दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.

संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .

✍१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.

2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर

✍३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .

✍नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .




0 Reviews:

Post a Comment

  1. Most Recent

Follow Us