प्रख्यात इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना ५४वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर


प्रख्यात इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना ५४वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय?

● ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यात सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. किंबहुना नोबेल पुरस्कारइतके महत्व ‘ज्ञानपीठ’ला भारतीय साहित्यात आहे.

●  भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखन कऱणाऱ्या आणि लेखनामध्ये नव-नवे प्रयोग करणाऱ्या साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

● - १९६१ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

●  साहू जैन आणि रमा जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवासाठी ‘ज्ञानपीठ’ची सुरुवात केली.

● २९ डिसेंबर १९६५ रोजी पहिला ‘ज्ञानपीठ’ देण्यात आला.

● मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरुप हे पहिल्या ‘ज्ञानपीठ’चे मानकरी ठरले.ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला हा पुरस्कार मिळाला.

‘ज्ञानपीठ’साठी निवड कशी केली जाते?

● भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

● भारतीय भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकाचा ‘ज्ञानपीठ’ने गौरव केला जातो.

● पुस्तक प्रकाशित होऊन किमान पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच विचार या पुरस्कारासाठी केला जातो.
● ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही.

●  सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख, सात लाख रुपये त्यानंतर आता ११ लाख एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते.

● जेव्हा एकाच वेळी दोन साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो, तेव्हा मानधनही विभागून दिले जाते.

● भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते.

● ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे.

● ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अॅ‍डव्हायझरी कमिटी म्हणतात.

●  ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

पुरस्काराचे स्वरूप

ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो.

वाग्देवीची प्रतिमा

● ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे.

● या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

अमिताव घोष

● अमिताव घोष यांचा जन्म कोलकात्यात ११ जुलै १९५६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण डून स्कूलमध्ये झाले.

● प्रसिध्द लेथक विक्रम सेठ आणि रामचंद्र गुहा हे त्याचे समकालिन सहकारी होते. डून स्कूलनंतर त्यांनी सेंट स्टिफन कॉलेज, दिल्ली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदवीचे शिक्षण घेतले.

● - न्यूयॉर्क येथे वास्तव करणाऱ्या अमिताव घोष यांनी भारतात परतून इबिस त्रयीवर काम करण्यास सुरुवात केली, ज्यात सी ऑफ पॉपीज (२००८), रिव्हर ऑफ स्मोक (२०११) आणि फ्लड ऑफ फायर (२०१५) यांचा समावेश आहे.

● - सन २००७ मध्ये त्यांना भारतीय सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले.

● २००९ मध्ये त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे फेलो म्हणून निवडण्यात आले.

● २०१५ मध्ये घोष यांना फोर्ड फाऊंडेशन आर्ट ऑफ चेंज फेलो म्हणून सन्मान मिळाला.

● - अमिताव घोष हे सर्किल ऑफ रीजन,द शेडो लाइन्स,द कलकत्ता क्रोमोसम,द ग्लास पॅलेस द हंगरी टाइड आणि सी ऑफ पॉपीज, या प्रसिध्द पुस्तकांचे लेखक आहेत.

● त्यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. घोष यांच्या 'शॅडो लाइन्स' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

मराठी साहित्याला चार वेळेस हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

१९७४ ययाती- वि स खांडेकर
१९८७ नटसम्राट वि वा शिरवाडकर
२००३ अष्टदर्शने – विंदा करंदीकर
२०१४  हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ- भालचंद्र नेमाडे


0 Reviews:

Post a Comment

  1. Most Recent

Follow Us